Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“संविधानाचा अनादर सुरू आहे!” दिल्ली-मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 12 October 2026, 20:22

मुंबई : काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू असलेली आंदोलने संविधानाच्या भावनेविरोधात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. संविधान हातात घेऊन देशातील संवैधानिक संस्थांबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक यांसारख्या संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

दिल्ली आणि मुंबई येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, संवैधानिक संस्थांविषयी लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करून या संस्था न्याय देऊ शकत नाहीत, असा संदेश पसरवला जात आहे. विरोधकांकडून चुकीचे कथानक तयार केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताच्या संविधानाला नाकारून देशात वेगळी राजकीय व्यवस्था प्रस्थापित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आपले म्हणणे ऐकून घ्यावे आणि भेट द्यावी, अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त केली जात असल्यावरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. न्यायाधीशांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटलेच पाहिजे, अशी तरतूद संविधानात कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून आणि एसआयआर प्रक्रियेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादामुळे देशातील राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही बाजूंकडून आपापल्या भूमिका मांडल्या जात आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00
Next Post

पुणेकरांनो दिवाळीला गावी जायचंय पण गर्दीचं टेन्शन येतंय? पुणे एसटी विभागाचा महत्वाचा निर्णय; ६०० विशेष गाड्यांची सोय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp