Health Tips : मुंबई : सध्याच्या काळात तर ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांमध्ये मोबाईलमध्ये गेम खेळणं, व्हिडीओ बघणे, मित्र मैत्रिणींबरोबर चॅटिंग करणे ह्या गोष्टींचे प्रमाण वाढलेलं दिसून येतंय. तर 7 ते 8 महिन्याच्या बाळांना सुद्धा जेवणाच्या वेळी मोबाईल हवा असतो. नाहीतर मुलं जेवत नाहीत. 18 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईलची आवश्यकता नसतानाही तासन्तास त्यांच्या हातात मोबाईल हवा असतो. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीराला नेमके कोणते नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मोबाईलच्या अती वापरामुळे त्याचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर होतो. आणि मग डोकेदुःखी, डोळ्यांतून पाणी येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे मुलांना चष्मा देखील लागू शकतो. सध्या लहान मुलांमध्ये मुख्यता चष्म्याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले तासन्तास मोबाईल घेऊन बसत असल्याने चष्म्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येतंय.
तज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी बसून होते. त्यामुळे त्यांच्या करमणुकीचे साधन म्हणजे मोबाईल, टि.व्ही हेच होते. याचा अती वापर झाल्याने त्याचा परिणाम हा मुलांच्या डोळ्यांवर झाल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे चष्मा लागण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यात 45 च्या पुढील वयोगटातील लोकांचा देखील समावेश आहे. जी मुले ऑनलाईन अभ्यास करतात, अशा मुलांना चष्मा असल्यास त्यांनी ब्ल्यूक्ट ह्या चष्म्याच्या ग्लासेस वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दरोज गार पाण्याने डोळे धुवावेत. त्याच बरोबर काकडी, गाजर, बीट या फळांचे सेवन केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.