Health News पुणे : जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा डॉक्टर चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. एवढेच नाही तर शरीरात कोणत्याही प्रकारची समस्या असेल समस्या असेल तर रात्री झोपून शरीर स्वतःला बरे करण्याचे काम करते. पण याच झोपेमुळे तुम्ही आजारीदेखील पडू शकता. जर तुम्ही जास्त झोपत असाल तर त्यामुळे मधुमेह, हृदयविकार इत्यादी वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात. (Health News)
जर तुम्ही जास्त झोपत असाल तर तुम्ही डिप्रेशन किंवा मानसिक आजाराला बळी पडू शकता. गरजेपेक्षा कमी किंवा गरजेपेक्षा जास्त झोपलात तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. संशोधनात हेदेखील आढळले की, जर तुम्ही दररोज 9 ते 10 तास झोपला तर त्यानंतरच्या 6 वर्षांत 21 टक्के लोक लठ्ठ होऊ शकतात. (Health News)
याशिवाय, दररोज जास्त काळ झोपत असाल तर काहींना डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण वाढल्याने किंवा कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. ज्याप्रमाणे निद्रानाशामुळे नैराश्याची तक्रार सुरू होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यासही नैराश्य येऊ शकते.
जगातील 15 टक्के लोक जास्त झोपेमुळे नैराश्याने ग्रस्त आहेत. एका संशोधनात असे आढळून आले की, 9 ते 11 तास झोप घेणाऱ्या 38 टक्के महिलांना इतर महिलांच्या तुलनेत कोरोनरी हार्ट डिसीजची समस्या असते. जे लोक रात्री 9 ते 11 तास झोपतात, त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. (Health News)