पुणे : लिव्हरमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात फॅट जमा होते तेव्हा फॅटी लिव्हर नावाच्या आजाराचा सामना करावा लागतो. फॅटी लिव्हर ही काही मोठी समस्या नाही, पण याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. फॅटी लिव्हर दोन प्रकारचे असतात. एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जे जास्त मद्यसेवन केल्याने होते आणि दुसरे म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही समस्या चुकीच्या आहारमुळे होते.
जेव्हा फॅटी लिव्हरची समस्या वाढते तेव्हा लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे लिव्हर योग्यपणे काम करत नसेल तर शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे शरीरावर बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. लिव्हर ट्रान्सप्लांटेशनच्या डॉक्टरांनी सांगितले की, लिव्हरची समस्या ही हृदयावर जास्त प्रभाव टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. लिव्हर फॅट उर्जेत बदलण्यास आणि आवश्यक प्रोटीनचे निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावते. जे हृदयासाठी महत्वाचे आहे.
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर किंवा क्रोनिक फॅटी लिव्हरसारख्या स्थितींमुळे लिव्हर खराब होते. याने लिपिड मेटाबालिज्म रोखले जाते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्चे प्रमाण वाढते. लिपिड मेटाबॉलिज्मचे संतुलन बिघडले तर एथेरोस्क्लेरोसिस वाढते. ज्यामुळे धमण्या ब्लॉक होतात. याच कारणाने हार्ट अटॅक येतो. लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या समस्या किंवा धोका कमी करायचा असेल तर वजन कमी करावं लागेल.