Health News पुणे : एकेकाळी चष्मा लावणारा मुलगा किंवा मुलगी हुशार, अभ्यासू असल्याचे समजले जात होते. पण आता मात्र चष्मा लावणारी व्यक्ती बोअर आणि कंटाळवाणी समजली जाते. सध्याच्या काळात तर कमी वयातच चष्मा लागणे ही खूप कॉमन गोष्ट झाली. याची कारणं म्हणजे असंतुलित आहार, तणाव, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपवर तासनतास बसून राहणे. पण, तुम्हाला चष्म्यापासून लवकरात लवकर मुक्ती मिळविण्यासाठी काही उपाय केल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो. (Health News)
हे एकदा करून पाहाच…
– तुरटीचा एक छोटा तुकडा गरम करून घ्या आणि त्याल गुलाब पाण्यात टाका. त्यानंतर हे पाणी प्रत्येक दिवशी रात्री चार-पाच थेंब डोळ्यात टाका. चष्म्याचा नंबर कमी व्हायला यामुळे मदत मिळेल.
– रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करा. सकाळी उठून हिरव्या गवतावर अनवाणी थोड्या वेळ चाला. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होण्यास मदत मिळेल, रोज तीन-चार कप ग्रीन टी प्यायल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते.
– दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा, यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होतात. एरंडीचे तेल किंवा मोहरीचं तेल डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांची सफेदी वाढते.
– सूर्यफुलाच्या बियांच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, सूर्यफुलाच्या बियांत विटामिन सी, विटामिन ई बीटा केरोटीन तसेच अॅन्टिऑक्सिडंट आढळतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. लिंबू आणि गुलाब पाणी समप्रमाणात मिसळून डोळ्यांमध्ये टाकल्याने त्याचा फायदा होतो.
– तुळशीच्या पानांचा रसाचे दोन थेंब दररोज डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांचा पिवळसरपणा दूर होतो.