Health News पुणे : ऋतू बदलला की सगळ्यात आधी त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पावसात भिजल्याने आरोग्य बिघडते. (Health News) या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. (Health News)
मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात ऊन तापत असल्याने उन्हाळासदृश्य परिस्थितीने शरीराची लाहीलाही होते. त्यासाठी पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर ते जीवघेणे ठरू शकते.
पावसाळ्यात सर्वात जास्त संक्रमण हे बाहेरच्या खाण्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत तब्येत चांगली राखायची असेल आणि मुख्य म्हणजे आजारी पडायचे नसेल तर या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. फिट अँड फाईन रहायचे असेल तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करणे महत्वाचे ठरते.
या टिप्स फॉलो करा
– पावसाळ्यात पाणी नेहमी उकळूनच प्यावे. पाणी उकळल्याने पाण्यातील जीवाणू नष्ट होतात.
– रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्याने शरीरातील हानिकारक किटाणू, जंत बाहेर पडतात.
– पावसाळ्यात जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करावे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढून उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
– या मोसमात ऋतूमानानुसार मिळणाऱ्या फळांचेच सेवन करावे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यातील पोषक तत्वामुळे शरीराचे पोषणही चांगले होते.
– जास्तीत जास्त पाणी प्यावे.
– कोल्ड ड्रिंकचा मोह टाळावा.
– हलके व पौष्टिक जेवण घ्यावे.
– पावसाळ्यात पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.
– मुख्य म्हणजे भरपूर झोप घ्यावी.
– या ऋतूमध्ये भोपळा, सुका मेवा, भाज्यांचे सूप, बीट असे पदार्थ खावेत.
– बाहेरचे खाणे टाळावे.
– शक्यतो इम्युनिटी वाढवणारे पदार्थ खावेत.
– आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.
– उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
– लिंबू पाणी, सरबत, लस्सी मोठ्या प्रमाणात घ्यावे.
– कच्चे पदार्थ खाणे टाळावे
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. चांगले आरोग्य हवे असेल तर बाहेरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. ते पदार्थ कसे, कधी बनवले, स्वच्छतेची काळजी घेतली आहे की नाही, याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूमध्ये अन्न उशीरा पचते. त्यामुळे कोणतेही कच्चे पदार्थ खाणे टाळावे.