Health News : कारले म्हटलं की त्याचा कडवटपणा आपल्याला लगेच लक्षात येतो. पण अनेकांना माहिती नसेल की हेच कारले आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असे आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ मुबलक प्रमाणात आढळते. दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं.
कारल्यामध्ये पॉलिपेप्टाइड मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिनसारखे काम करते. याशिवाय, कारल्यामध्ये असलेले चरेंटिन तत्व शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
कारल्याचा रस प्यायल्याने यकृत बळकट होतंच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळमध्ये देखील कारले फायदेशीर आहे.
पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते, जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतात. उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो.