Health News : हात आणि पायांना मुंग्या येणं ही समस्या अनेकांनी अनुभवली असेल. पण याकडे दुर्लक्ष करू नये. काही घरगुती उपाय आहेत ते केल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. हात आणि पायांना मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या असू शकते. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता हे एक त्यामागचे कारण असू शकते. जे मुंग्या येणे आणि इतर समस्यांच्या विकासाशी संबंधित आहे. ‘व्हिटॅमिन डी’चे मुख्य कार्य म्हणजे आपली हाडे आणि स्नायू निरोगी करणे. हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांमधून मिळतात. तसेच मासे, दूध आणि अंडी यासारख्या पदार्थातही असतात. ‘व्हिटॅमिन डी’ गरजेचे असल्याने ते कसे मिळवता येईल, हेदेखील पाहणे गरजेचे आहे.
सूर्यफूल तेलात ‘व्हिटॅमिन डी’..
सूर्यफूल तेलात ‘व्हिटॅमिन डी’ असते. याचा उपयोग अन्नासाठी होत नाही, तर तो त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. सूर्यकिरणे ‘व्हिटॅमिन डी’चा उत्तम स्रोत आहेत. कोवळ्या उन्हात, सकाळी सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते.
आहारात दुधाचा समावेश करावा..
दूध हा ‘व्हिटॅमिन डी’चा चांगला स्रोत आहे. एक कप दुधात सुमारे 100 आययू ‘व्हिटॅमिन डी’ असते. हे दूध ‘व्हिटॅमिन डी’ने भरपूर असल्याने याचा शरीराला फायदा होतो. परिणामी, मुंग्या येण्याच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.