Health News : पुणे : आजकाल सर्वसमान्यांना असे वाटते की, ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते. त्यामुळे अनेकांना चहाची सवय सोडून ब्लॅक कॉफी प्यायला सुरूवात केली आहे. काहींती तर आज अशी परिस्थीती झाली आहे की. ते ब्लॅक कॉफी शिवाय जगू शकत नाही. काही जणांचा दिवस कॉफी प्यायल्याशिवाय सुरू होत नाही. पण होय, एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कॉफी प्यायल्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि परिणामी वजन कमी होते.
तज्ज्ञ सांगतात की, ‘तुम्ही जर रोज चार कप ब्लॅक कॉफी प्यायली तर तुमच्या शरीरातील फॅट्स चार टक्क्यांनी कमी होऊ शकते.’ या संशोधनानुसार वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. ‘जर ब्लॅक कॉफीमध्ये साखर किंवा कोणतेही गोड पदार्थ न टाकता प्यायले तर त्याचा दुप्पट फायदा मिळू शकतो’, असा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.शिवाय ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजची संख्या खूप कमी आहे, यावर तज्ज्ञांनी जास्त भर दिला आहे.
त्याशिवाय ब्लॅक कॉफीचा दुष्परिणाम सुद्धा होतो, जेव्हा कमी प्रमाणात ब्लॅक कॉफी घेतली जाते, तेव्हा त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण, अति प्रमाणात कॉफी प्यायल्यामुळे निद्रानाश, चिंता, हृदयाची गती जलद होणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि मळमळ यांसारखे नको असलेले दुष्परिणाम होतात.
वजन कमी करण्यास मदत करते
ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. “हे कॉफीमध्ये आढळणारे एक महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट, फिनोलिक ग्रुपचे एक संयुग आहे. जे जेवणानंतर इन्सुलिन आणि ग्लुकोजची होणारी वाढ कमी करते, परिणामी वजन कमी होते. ते नवीन फॅट्स तयार करणाऱ्या पेशींच्या निर्मितीस विलंब करते, ज्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होतात आणि ॲन्टीडायबेटिक, डीएनए आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह परिणादेखील दर्शवते.