Health News पुणे : तुम्ही नाष्टा करताना अनेकदा व्हाईट ब्रेड खात असाल, पण व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी फायदेशीर नाही. विशेषत: जे लोक आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, (Health News) त्यांनी तर हा ब्रेड खाताना विशेष काळजी घ्यायला हवी. पण काहींचा असा समज आहे की, ब्रेड खाल्ल्याने वजन वाढू शकते. पण तसे अजिबात नाही. (Health News)
ब्रेडमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याचे अनेकांना वाटते. पण ते तसे नाही. काही ब्रेड असे आहेत जे आरोग्यासाठी तर चांगलेच असतात, पण वजन कमी करण्यासही फायदेशीर असतात. जर नाष्टा करताना हे ब्रेड खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. काही ब्रेड हेल्दी तर आहेतच शिवाय वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.
गव्हापासून तयार केला जातो ब्राऊन ब्रेड
संपूर्ण गव्हाचा ब्रेड किंवा त्याला ब्राऊन ब्रेड असेही म्हणतात. हा ब्रेड गव्हापासून तयार केला जातो, जो मैद्याने बनवलेल्या पांढऱ्या ब्रेडपेक्षा आरोग्यदायी असतो. मैद्याच्या ब्रेडमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते.
मधुमेह होण्याचा धोका कमी
ब्राऊन ब्रेड खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. या ब्रेडमध्ये सर्वच पोषक घटक असल्याने व्हाईट ब्रेडपेक्षा जास्त आरोग्यदायी ठरतात. गव्हाच्या ब्रेडमध्ये देखील फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही वारंवार खाणे टाळू शकता. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात.