Health News : आपल्यापैकी अनेकांना खूप खायला आवडत असेल. असे फूडी लोक पोट भरले तरीही एखादा आवडता पदार्थ खात राहतात. आपण रेस्टॉरंटमध्येही जास्त प्रमाणात खात असतो; ज्यामुळे अनेकदा आपल्याला गॅसेससारख्या पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्हाला काही खबरदारी घेण गरजेचे आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते, पोट भरल्यावर आपणाला ढेकर येतात आणि अस्वस्थता निर्माण होते. ही अवस्था आपल्याला खाणं बंद करण्याचे संकेत देत असते. मात्र, असे काही लोक असतात; जे या संकेतांकडे दुर्लक्ष करतात आणि पोट भरलं तरी खात राहतात. जर तुम्ही डायट घेत असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तळलेल्या भाज्या, ग्रिल्ड पदार्थ, तंदुरी चिकन असे पदार्थ खाणे टाळावे.
चिकन करी आणि मिठाई या पदार्थांपासून दूर राहा. जेवताना छोटा चमचा वापरा आणि आपल्या डिशमधील प्रत्येक घासाचा आनंद घ्या. त्यामुळे तुम्हाला अगदी कमी प्रमाणात खाऊनही समाधानी राहणे शक्य होईल.
रात्रीचे हलके जेवण घ्या. चपाती खाणं थोडं जड होऊन बसतं. याशिवाय जेव्हा चपाती पोटात जाते तेव्हा ती साखर निर्माण करते. जे झोपल्यानंतर रक्तात जाऊ शकते आणि रात्री चपाती खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.