Health News : कोरोना नंतर आता H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसचा उद्रेक होऊ लागला आहे. H3N2 हा इन्फ्लूएंजाचा नवा स्ट्रेन आहे आणि हा गतीने पसरत आहे. व्हायरसमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस म्यूटेट झाला आहे आणि लोकांमध्ये याला प्रतिकार करण्यासाठी इम्यूनिटी कमी झाली आहे. यामुळे हा व्हायरस वेगाने पसरत आहे. जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय –
लक्षणे…
यात ताप, नाक वाहणे किंवा बंद होणे, त्याचबरोबर घशात खवखव, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, थकवा व सर्दी सारखी लक्षणे दिसतात.
H3N2 विषाणूमुळे होणारी लक्षणे दोन ते तीन आठवडे टिकू शकतात. बहुतेक रुग्णांना दोन ते तीन दिवस जास्त ताप असतो. यासोबतच अंगदुखी, डोकेदुखी आणि घशात अस्वस्थता जाणवू शकते.
संसर्ग होण्याची कारणे…
H3N2 हा संक्रमित होणारा व्हायरस आहे. गर्दीच्या ठिकाणी हा व्हायरस लवकर पसरतो.
फ्लूची बाधा झालेली व्यक्ती शिंकली की त्याचे ड्रॉपलेट हवेत पसरतात.
दुसरी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी खालील काळजी घ्या –
आपले हात साबण आणि पाण्याने धुवा.
मास्क घाला.
नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक झाका.
भरपूर पाणी प्या.
ताप आणि अंगदुखीवर लवकर ईलाज करा.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
स्वत: अँटीबायोटिक घेणं टाळा.