Health पुणे : चणे खाणे फायद्याचे असते. काही लोक काळे चणे भाजीत खातात तर कोणी डाळीत याचा समावेश करतात. काहीजण चणे भाजूनही खातात तर काहीजण उकळवून. (Health) भिजवलेले चणे खाणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. (Health) चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, एनर्जी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसे, झिंक, कॉपर, व्हिटमीन बी-3 आणि सोडियमसारखे पोषक तत्व असतात. (Health)
याव्यतिरिक्त त्यात एंटीऑक्सिडेंट्स, एंटीबॅक्टेरियल आणि एंटीफंगल गुणही असतात. रोज भिजवलेले चणे खाल्ल्याने तब्येत कायम निरोगी राहते. भिजवलेले चणे खाल्ल्यास बरेच फायदे मिळतात. याशिवाय भिजवलेल्या चण्यांचे पाणी प्यायल्यानेही तब्येतीला पुरेपूर फायदे मिळतात. भिजवलेले चणे पचन चांगलं ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतडे आणि पोटातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि तुमचे शरीरही डिटॉक्स होते. पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात. जर तुम्हाला गॅस, अपचन यांसबंधीत कोणत्याही समस्या असतील तर चण्यांचे सेवन करायला हवे.
पोटॅशियम, फॉलेट आणि मॅग्नेशियम हृदयासाठी चांगले असते. रोज रिकाम्यापोटी भिजवलेल्या चण्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते. तुम्ही रोज भिजवलेले चणे खाल्ल्यास तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. याव्यतिरिक्त तुम्ही ओव्हरइटिंग करणं थांबवू शकता.
वजन नियंत्रणात राहण्यासाठी भिजवलेले चणे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे तुमची सतत खाण्याची इच्छा कमी होईल. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी भिजवलेल्या चण्यांचे सेवन उत्तम ठरते.