Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह एक सदस्य बोगस ठरावप्रकरणी अपात्र ; ग्रामविकासमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 July 2023, 21:15

सुरेश घाडगे
परंडा : पदाचा दुरुपयोग करून शेत रस्त्याचा बोगस ठराव तहसील कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी  तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचासह एका सदस्याला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अपात्र ठरविले आहे.

लोणी येथील तक्रारदार विठ्ठल सर्जेराव शिंदे यांनी ॲड. विजयकुमार शिंदे यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाविरूद्ध महाजन यांच्याकडे अपील दाखल केले होते. शिंदे यांनी लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच राणी शिंदे, उपसरपंच विनोद शिंदे व ग्रामपंचायत सदस्या प्रियंका माळी यांच्या विरूध्द तक्रार केली होती.

ऐनापूरवाडी शिवारातील गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामसेवक यांच्या परस्पर बोगस ठराव जोडून तहसील कार्यालयात दाखल केल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी लेखी तक्रार शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

 

या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाहीस्तव हे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ८ फेबुवारी २०२३ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांचा तक्रारी अर्ज फेटाळण्यात आला होता.

विभागीय आयुक्त यांच्या निर्णया विरूद्ध तक्रारदार विठ्ठल शिंदे यांनी ॲड.विजयकुमार शिंदे यांच्यामार्फत गिरीश महाजन यांच्याकडे १७ जानेवारी २०२३ रोजी अपील दाखल केले होते.

२१ जून २०२३ रोजी या प्रकरणाची मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ऐनापूरवाडी येथील जमीन गट नंबर २१ व गट नबंर २२ मधून शेतरस्ता करण्याच्या ठराव ग्रामपंचायत कार्यालयाने घेतला नसल्याचे पत्र ग्रामसेवक यांनी २८ मार्च २०२२ रोजी तक्रारदार विठ्ठल शिंदे यांना दिले होते.

याचप्रमुख कारणावरून ॲड. विजयकुमार शिंदे यांनी युक्तीवाद करून अर्जदाराची बाजू मांडली. सर्व कागदपत्राची पडताळणी करून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विभागीय आयुक्त यांचे आदेश रद्द करून विठ्ठल शिंदे यांचे अपील मंजूर केले आहे. त्यामुळे सरपंच राणी शहाजी शिंदे यांना सरपंच व सदस्य पदावरून तर उपसरपंच विनोद पांडूरंग शिंदे यांना उपसरपंचपदावरून व सदस्यपदावरून तर  ग्रा.प सदस्या प्रियंका माळी यांना सदस्यपदावरून काढण्यात येत असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महाजन यांनी दिला असल्याची माहिती ऍड. शिंदे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Health : भिजवलेले चणे खा अन् स्वस्थ राहा; रोज रिकाम्यापोटी खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.