Health पुणे : ऊसाचा रस हा आपण अनेकजण आवडीने पितच असतो. उन्हाळा सुरू होताच लोकांमध्ये उसाच्या रसाची मागणीही वाढते. या ऊसाच्या रसाचे फायदे आपल्यापैकी अनेकांना माहिती असतील पण हाच काही लोकांसाठी तोट्याचाही ठरू शकतो. (Health)
ऊसाचा रस हा चव आणि पौष्टिकतेने समृद्ध असा आहे. हा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो आणि अनेक रोगांपासून दूर ठेवतो. ऊसाच्या रसामध्ये असलेले कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम यासारखे अनेक आवश्यक घटक पचन, हाडे आणि किडनीचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात आणि ऍनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांना ऊसाचा रस न पिण्याचाच सल्ला आहे. ऊसाचा रस कोणी पिऊ नये याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत…
डायबेटिसच्या रुग्णांनी टाळावा…
ऊसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. ज्याचा मधुमेहाच्या रुग्णाच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनानी ऊसाचा रस पिऊ नये असा सल्ला दिला जातो.
लठ्ठपणा असलेल्यांनी टाळावे…
ऊसाच्या रसात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ऊसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास वजन वाढू शकते. कारण ऊसाच्या रसात भरपूर कॅलरीज आणि साखर असते. त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढू शकते.
अति प्यायल्याने होऊ शकतो त्रास…
ऊसाच्या रसामध्ये असलेल्या पॉलिकोसॅनॉलचा पचनसंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचे अति पिणे टाळावे. ऊसाच्या रसाच्या अति पिण्याने काहींना पोटदुखीसोबत उलट्या, चक्कर येणे, निद्रानाश आणि जुलाबाचा त्रासही होऊ शकतो.