Health Care | अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. अतितेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ खाणे, पुरेशी झोप न घेणे, रात्री खूप उशिरा झोपणे, रात्री उशिरा आणि भरपेट जेवण करणे, रात्री भरपेट जेवून तात्काळ झोपणे, मद्यपान करणे, गोळ्या औषधे खाणे, अतिकडक उपवास करणे, पचनास जड असलेले उपवासाचे पदार्थ खाणे, खूप वेळ उपाशी राहणे, शिळे अन्न यांसारख्या अनेक कारणांनी अॅसिडिटी वाढून छातीत जळजळ होते.
काही घरगुती उपाय करून या समस्येपासून आराम मिळवता येतो….
१. लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या.
२. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या.
३. जेवणाच्या अर्धा तास आधी २-३ चमचे कोरफडीचा रस प्या.
४. एक चमचा जिरा एक कप पाण्यात उकळा. पाणी थोडे उकळवून अटवून घ्या. थंड झाल्यानंतर हे जिऱ्याचे पाणी प्या.
५. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानेही छातीतील जळजळ थोड्या प्रमाणात कमी होते.
६. जेवणानंतर थोडा गूळ खाऊन एक ग्लास पाणी प्या. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचन क्रियेला गती मिळते तसेच पोटात अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध होतो.
७. थंडगार दूध पिल्यानेही अॅसिडिटीपासून तात्पुरती मुक्ती मिळते.
८. अॅसिडिटी कमी करण्यासाठी आवळा सुपारी, आवळा कॅंडी किंवा आवळ्याची एखादी फोड खा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे
Health Care : ‘या’ उपायांनी डबल चीन घालवा आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा