Hair Care | अनेकांना केसांना चाई पडण्याची समस्या जाणवते. तसेच चाई फक्त डोक्यातच नाही तर भुवयांचे केस, दाढीचे केस येथेही पडते.
जाणून घ्या चाई पडण्याच्या समस्येवर घरगुती उपाय –
१) गुंजा बी उगाळून चाई पडलेल्या ठिकाणी तीन दिवस लावा. यामुळे चाई पडलेल्या ठिकाणी लवकर केस उगवण्यास मदत होते.
२) जमालगोटा बी उकळा. नंतर ते चाई पडलेल्या ठिकाणी तीन दिवस लावा. यामुळे लवकर केस येण्यास मदत होते.
३) एक चमचा कांद्याचा रस घ्या. एक चमचा लसणाचा रस घ्या. एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्वांचे एकत्र मिश्रण करा आणि चाई पडलेल्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी लावा. महत्त्वाचं म्हणजे सकाळी केलेला रस संध्याकाळी लावू नका. प्रत्येक वेळेस ताजे मिश्रण तयार करा आणि लावा.
४) मोहरी बारीक वाटून घ्या. त्यात खोबरेल तेल मिसळा. नंतर एक दिवस हे मिश्रण भिजत राहू द्या. नंतर रोज सकाळ आणि संध्याकाळ हे मिश्रण चाई पडली आहे तिथे लावा. यामुळे लवकर केस उगवतील.
५) पांढऱ्या जास्वंदाची फुले आणि पाने असतील तर त्याचा रस काढा. तो डोक्याला लावा. तसेच जास्वंदीच्या फुलाचे लहान-लहान तुकडे करा. त्यात खाण्याचा सोडा टाकून बारीक पेस्ट करा. नंतर चाई पडलेल्या ठिकाणी लावा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health News : अधिक प्रमाणात लसूण खाल्यामुळे शरीराचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी काजू उपयुक्त, जाणून घ्या काजू खाण्याचे फायदे