आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास काही आजार नक्कीच टाळता येऊ शकतात. त्यात शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम काही पदार्थ करतात. त्यामुळे ते टाळल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही जर चरबीयुक्त पदार्थ सातत्याने खात असाल तर ते टाळणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतं.
चरबीयुक्त पदार्थ जसे की मांस, पाम तेल, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि स्नॅक्स खाणे टाळावे. हे पदार्थ तुमचे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण बनू शकतात. ज्यामुळे तुम्हाला संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. याशिवाय लठ्ठपणा, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांना तुम्ही बळी पडू शकता. तसेच अनेकांना गोड खाण्याची खूप आवड असते. त्यांची ही आवड धोकादायक ठरू शकते. असे लोक मधुमेहाचे बळी ठरू शकतात.
साखर नेहमी मर्यादित प्रमाणात खावी. जास्त साखरेचे सेवन केल्याने तुम्हाला मधुमेह अर्थात डायबिटीसचा धोका वाढू शकतो. जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मिठाचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने तुमची कोलेस्ट्रॉल पातळी वाढू शकते. पांढऱ्या मिठाऐवजी तुम्ही रॉक सॉल्ट, काळे मीठ, हिमालयीन गुलाबी मीठ आणि लिंबू मीठ वापरू शकता.