Health Tips : केसांची योग्य खबरदारी न घेतल्यास केस रूक्ष होणं, टोकाशी दुभंगणं, निस्तेज दिसणं इत्यादी त्रास उद्भवतात. तसेच केसांचे आरोग्य केसांवर अधिक प्रमाणात केमिकल आणि आयर्निंगचा वापर झाल्याने नंतर केस रुक्ष आणि कोरडे बनतात. यापासून वाचायचे असेल तर काही घरगुती उपायांनी केस सरळ आणि मुलायम बनवता येतात. जाणून घ्या घरगुती उपायांनी केस सरळ आणि मुलायम बनविण्याची पद्धत – (Follow these tips to get soft and straight hair)
केस सरळ आणि मुलायम बनविण्याची पद्धत
दूध व मध सारख्या प्रमाणात घेऊन मिश्रण बनवा. हे मिश्रण केसांना लावा. एक तासाने केस धुवून टाका.
दूध आणि पाणी मिक्स करून केसांवर स्प्रे करा. नंतर केस सरळ विंचरा. एक तासाने केस धुवून टाका .
अंड्याचा बलक फेटून घ्या. त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. (Health Tips) हे मिश्रण केसांवर लावा. दोन तासांनी केस धुवून टाका.
नारळ पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून ५-६ तास फ्रिजमध्ये ठेवा. (Health Tips) नंतर ही पेस्ट केसांना लावा व हलक्या हाताने मसाज करा. नंतर केस धुवून स्वच्छ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
एक कप दुधात दोन चमचे मध व अर्धे केळ टाकून मिक्स करा. (Health Tips) हे मिश्रण केसांवर लावा. एक तासानंतर केस धुवून टाका.
केसांना कोमट कॅस्टर ऑईलने मालिश करा. नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून केसांना वाफ द्या. (Health Tips) अर्ध्या तासाने केस धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : पोटावर अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Health Tips | अकाली टक्कल पडू नये म्हणून केसांची अशी घ्या काळजी…