सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे अनेकांना विशेष असे लक्ष द्यायला जमत नाही. त्यामुळे काही समस्या भेडसावू शकतात. नियमित आहार, व्यायाम आणि इतर काही बाबींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यात जर तुमची पचनक्रिया सुधारायची असेल तर ब्लूबेरी हे फळ चांगलेच चमत्कारी ठरू शकेल.
जेव्हा आतड्यांसंबंधी आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा काय करावं, काय नको हे अनेकांना समजत नाही. आपली पचनप्रक्रिया केवळ शरीराला पोषण पुरवण्याचे काम करत नाही, तर त्याचा एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आतडे निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. पण, ब्लूबेरीचे असे काही फायदे समोर आले आहेत जे कदाचित आजपर्यंत फार कमी लोकांना माहीत असतील. ब्लूबेरीचे नियमित सेवन केल्याने आतड्यांमधले चांगले बॅक्टेरिया तर वाढतातच, पण जळजळ होण्याशी संबंधित समस्याही कमी होतात. हे एक सुपरफूड बनू शकते जे चवीसोबत आरोग्याची काळजी घेते.
ब्लूबेरीमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल आणि फायबर आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम सुधारण्यास मदत करतात, असे मानले जाते. ज्यांनी ब्लूबेरी खाल्ल्या आहेत, त्यांच्या पचनामध्ये सुधारणा झाली आणि आतड्यांसंबंधी समस्या कमी झाल्या. निरोगी पोटाचे रहस्य ब्लूबेरीमध्ये दडलेले आहे. ब्लूबेरी केवळ चवीनुसारच नाही तर पौष्टिकतेचे पॉवरहाऊस देखील आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: पॉलिफेनॉल्स भरपूर असतात, जे आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. असे जरी असले तरी त्याचे प्रमाणही कमी प्रमाणात असावे.