आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीसारख्या पेयाने करतात. भरपूर प्रमाणात कॅफिन असल्याने, हे पेय शरीराला ऊर्जा देण्यास आणि झोप दूर करण्यास मदत करते. पण असे जरी असले तरी कॉफी जास्त प्रमाणात पिणे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
कॅफिन एक उत्तेजक आहे जे त्वरित सतर्कता, ऊर्जा आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करते. कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केल्याने फॅटी लिव्हरसारख्या यकृताच्या आजारांचा धोका कमी होतो. जास्त कॅफीनमुळे पुनरुत्पादन, गर्भधारणा, ग्लुकोज नियंत्रण इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. कॅफिन असलेल्या गोष्टींच्या अतिसेवनामुळे, चिंता-उदासीनता सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो.
कॅफीनचे सेवन योग्य प्रमाणात केले तर वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय हे यकृत आणि मेंदूसाठीही फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. परंतु, जर तुम्ही जास्त प्रमाणात कॉफी प्यायली तर त्यामुळे टाइप-2 मधुमेह आणि गर्भधारणेशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढू शकतो. प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे अतिरिक्त कॅफिन देखील आढळले आहे.