Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळांच्या सुट्ट्यांमध्ये घट होऊन कामकाजाचा वेळ वाढणार : राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे संकेत..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 19 October 2024, 8:39

संतोष पवार 

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय-राज्य सुट्ट्या, सत्र सुट्टी, अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून, हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत राज्य अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. त्यात राज्य मंडळाच्या शाळांसाठीही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) वार्षिक वेळापत्रक लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सीबीएसईशी संलग्न शाळांचे नवीन वर्ष १ एप्रिल रोजी सुरू होऊन ३१ मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करून संपते. या शाळांना मेमध्ये उन्हाळी सुट्टी आणि सत्र संपल्यावर किंवा राष्ट्रीय सण-समारंभाच्या अनुषंगाने काही दिवसांच्या दीर्घ सुट्ट्या दिल्या जातात. मे महिन्यातील सुटीनंतर शाळा १ जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात. सीबीएसई संलग्न शाळा भारतभर आणि भारताबाहेरही सुरू आहेत. याचा अर्थ उत्तर भारतातील अति थंड किंवा अति उष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रांमध्ये, अतिवृष्टीप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक समान असल्याचे दिसून येते.

सद्या:स्थितीत राज्यातील पूर्ण वेळ शाळा सहा ते साडेसहा तास भरतात, तर अध्यापनासाठी चार ते साडेचार तास असतात. इमारत अपुरी असल्यामुळे किंवा विद्यार्थिसंख्या जास्त असल्यामुळे अनेक शाळा दोन सत्रांत चालवाव्या लागतात. या शाळांना उपलब्ध होणाऱ्या वेळेचा विचार करावा लागणार आहे. अशा दोन सत्रांतील शाळांना दिवसाला जास्तीत जास्त साडेपाच तास उपलब्ध असतात. त्यात अध्यापनासाठी साडेचार तास मिळतात. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार दैनंदिन पाच ते साडेसहा तास अध्यापन होणे आवश्यक केले आहे.

त्यात तिसरी ते पाचवीसाठी घड्याळी एक हजार तास, सहावी ते दहावीसाठी घड्याळी १२०० तास शैक्षणिक कामकाज होण्याची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता सर्व शाळांमध्ये होणे कठीण आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. दैनंदिन कामकाजासाठी वेळ कमी मिळत असल्याने शाळा जास्त दिवस सुरू ठेवून तो कालावधी वर्षभरात भरून काढता येईल. वर्षभरात अभ्यासक्रमाचा कार्यभार प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वार्षिक वेळापत्रक लागू करणे आवश्यक आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26
Next Post

तुम्हीदेखील जास्त प्रमाणात कॉफी पिताय? तर आताच थांबवा, आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp