चहा हे पेय आपल्यापैकी अनेकांना आवडत असेल. चहा पिणं हे तुम्हाला चांगलं वाटत असलं तरीही त्याचे काही दुष्परिणामही आहेत. याची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे. दुधाचा चहा जास्त प्रमाणात पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. चहामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
जर तुमची सकाळ चहाशिवाय सुरू होत नसेल, तर ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, दुधाचा चहा जास्त प्रमाणात पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. चहामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. याशिवाय दिवसातून अनेकवेळा चहा प्यायल्याने निद्रानाश आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चहाने कोलेस्टेरॉल वाढते. चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते.
हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. याशिवाय हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. याशिवाय कोलेस्टेरॉलमुळे रक्तदाबही वाढतो. चहाच्या अतिसेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा चेहरा, गाल आणि कपाळावर पिवळे डाग दिसू लागतात. यासोबतच विनाकारण पाय दुखणे आणि हात-पाय पिवळे दिसणे ही समस्याही उद्भवू शकते.
जास्त चहा पिणे टाळा
दुधाचा चहा आणि कॉफी घेताना सावध राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही दिवसभर थकवा आणि डोकेदुखीच्या समस्येशी झुंज देत असाल तर याचे कारण चहाचे अतिसेवन असू शकते. चहा प्यायचाच असेल तर ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.