तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील. जर तुम्हीही काळ्या वर्तुळांमुळे त्रस्त असाल तर यापासून दूर कसं राहावं याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. ताणतणाव, झोप न लागणे, जास्त स्क्रीन टाईम यांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसतात. चेहऱ्यावर काळी वर्तुळे वेगळी दिसतात आणि संपूर्ण लूक खराब करतात.
Vitamin K च्या कमतरतेमुळे काळ्या वर्तुळांची समस्या उद्भवू शकते. जेव्हा शरीरात Vitamin K ची कमतरता असते, तेव्हा डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेच्या पेशी तुटतात, ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. Vitamin K व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे देखील काळ्या वर्तुळाची समस्या उद्भवू शकते. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी सकस आहार घ्या. सकस आहारासाठी हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, काजू इत्यादींचे सेवन करा.
या जीवनसत्त्वांसाठी पालक, ब्रोकोली, कोबी, मासे, अंडी आणि फुलकोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के आढळते. व्हिटॅमिन सी लिंबूवर्गीय फळे आणि भाज्यांमध्ये आढळते, ज्यात ब्रोकोली, टोमॅटो, लिंबू, किवी, संत्री, आवळा आणि द्राक्षे यांचा समावेश होतो. याचाही आहारात समावेश करा. याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.