Corona Update नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाची आज दहा हजार ५४२ प्रकरणे समोर आली आहेत. मंगळवारी कोरोने सात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ६३ हजार ५६२ पोहचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार…!
कोरोनाची लागण झाल्यामुळे देशात 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित झालेल्यांची एकूण संख्या ४,४८,४५,४०१ झाली आहे. त्याच वेळी, यामुळे मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 190 वर पोहोचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत.
सध्या देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण ४.४७ टक्के नोंदवले गेले आहे. त्याच वेळी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.67 टक्के आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,42,50,649 झाली आहे, तर मृत्यूदर 1.18 टक्के नोंदवला गेला आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे एप्रिलमधील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. राज्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून नवीन ९४९ रुग्ण आढळून आले आहेत.