Corona JN1 Variant : मुंबई : देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढत आहे. नागरिक चिंतेत सापडले आहेत. आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये ही सर्वांना भिती आहे. त्यामुळे सगळे डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. कोणी आयपर्वेदीक औषधांचा वापर करत आहे. कोविडचा नवीन प्रकार धोकादायक नसला तरी झपाट्याने पसरत आहे.
जेएन.१ व्हॅरिएंट्ची लक्षणे – जेएन.१ ची कोणतेही खास लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे, याची लक्षणे ही कोवीड-१९ च्या अन्य व्हॅरिएंटसारखी आहेत की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. ताप येणे, लवकर थकवा येणे, सारखा खोकला येणे, सर्दीमुळे नाक बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, अतिसार, सर्दी अशी लक्षणे आहेत, असे जाणकारांकडून सांगण्यात आले आहे.
काळजी कशी घ्यावी
मुबलक सूर्यप्रकाश – हिवाळ्यात आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर लोक जास्त आजारी पडतात. फक्त 10 ते 15 मिनिटांच्या सूर्यप्रकाशामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाश अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतो.
व्हिटॅमिन सीसाठी लिंबूवर्गीय फळे खा – हा उपाय करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि मध देखील टाका. हे मिश्रण मिक्स करून प्यायल्याने घसा साफ होतो. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी घसा साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कॅलरीज – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कॅलरीज उपयुक्त ठरतात. व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यामुळे, शरीराला उपयुक्त कॅलरीज मिळतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होईल. उपयुक्त कॅलरीजसाठी तुम्ही आहारात साखर, गूळ, फळे, फळांचे ज्यूस, तूप आणि कर्बोदकांचा आहारात समावेश करू शकता.
हिरव्या भाज्या खा – तुमच्या आहारात विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकार, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते . पालेभाज्या पालेभाज्या निरोगी आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरलेले आहेत परंतु कॅलरी कमी आहेत.
हळदीचे दूध प्या- हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडेही मजबूत होतात. त्यामुळे जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिऊ शकता. मेंदू तीक्ष्ण होतो. विचार करण्याची क्षमता वाढते. डोकं नेहमी दुखत नाही. पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
रोज प्राणायाम करा – प्राणायामामध्ये श्वास घेणे आणि बाहेर टाकणे यांचा समावेश होतो. असे केल्याने, फुफ्फुस मजबूत होतात आणि कार्यक्षमता सुधारते. जर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित काही समस्या असतील तर या योगाने ती समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणूनच रोज प्राणायाम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
गरम पाणी प्या – कोमट पाणी पिणे ही अनेकांची शक्ती बनते कारण ते घशाला आराम देते आणि शरीर स्वच्छ करते. आम्ही तुम्हाला सांगतो की असे केल्याने तुमच्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते, चला जाणून घेऊया की आपण जास्त गरम पाणी का पिऊ नये.
तुळस उकळून ते पाणी प्या – तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते. तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज हे पाणी रोज घ्या.
तळलेले अन्न टाळा – तळलेले अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्ही दिवसभर पोटाच्या समस्यांना बळी पडू शकता. म्हणूनच उठल्यानंतर कींवा झोपण्याआधी तळलेले पदार्थ खाऊ नका.