पुणे : भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,43,654 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.33% आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.47% झाला आहे. गेल्या 24 तासात 16,113 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,31,13,623 झाली आहे.
गेल्या 24 तासात, देशात नव्या 15,528 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.गेल्या 24 तासात देशात एकूण 4,68,350 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 01 लाखांहून अधिक (87,01,55,452) चाचण्या करण्यात आल्या आहेत.देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.57% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.32% इतका नोंदला गेला आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 200.33 कोटींचा (2,00,33,55,257) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,64,01,846 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.