मुंबई : यावर्षी देशात धान्याचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवणार नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले असून त्यासाठी सरकाराने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत सरकारने यावर्षी ६. ८ टक्के अधिक तांदळाची खरेदी केल्यामुळे यावर्षी अन्नधान्याचे संकट उभे राहाणार नासल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील तांदळाचे उत्पादन मोठया प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या घडीला केंद्र सरकार विविध राज्यांकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी करत आहे.
केंद्र सरकारकडे बफर स्टॉक पुरेसा असून कुणीही अन्न धान्याचा साठा करून ठेवू नये असते सरकारकडून सांगण्यात येत आहे. यामुळे तांदळाच्या किमती देखील स्थिर राहणार असून महागाईचा परिमाण तांदळाच्या किमतीवर होणार नसल्याची शक्यता आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या आकडेवारीनुसार चालू हंगामात २०२२-२३ मध्ये ७ नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारने २१.४५ दशलक्ष टन तांदळाची खरेदी केली होती. जी मागील वर्षीच्या तुलनेत ६. ८ टक्क्याने जास्त आहे.
यावर्षी सरकार साठा करण्यासाठी तांदूळ लवकर खरेदी करत आहे, याचे मुख्य करणे म्हणजे सरकारकडे असलेला तांदळाचा साठा मागीलवर्षी तब्बल १९ टक्कयांनी कमी झाला होता.
केंद्र सरकारने पंजाब, हरियाणा व तामिळनाडू या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी करण्यास सुरुवात केली असून जिल्हानिहाय अहवाल थेट दिल्लीला पाठविण्यात येत आहे.
आतापर्यंत अन्नधान्य उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर होता, मात्र, यंदा गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले आहे.