Breaking News | जुन्नर : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आपटाळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आलेल्या महिलांना चक्क जमिनीवरच झोपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
मिळालेल्या माहितीनुसार, आपटाळे आरोग्य उपकेंद्रात आदिवासी नागरीक उपचारासाठी येतात. या उपकेंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा कॅम्प घेतला जातो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी या उपकेंद्रात महिला उपचारासाठी आल्यानंतर त्यांना जमिनीवरच एका ओळीत झोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना आरोग्य उपकेंद्रात गादी टाकून देण्याची आवश्यकता आहे. त्यापण माणूसच आहेत ना? असा प्रश्न रुग्णांकडून विचारला जात आहे.याबाबत बोलताना जुन्नरच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ म्हणाल्या की, या महिलांना भूल देण्यासाठी या ठिकाणी झोपवले. मात्र त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना गादीवर झोपले जात होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Junnar : ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला अपघात; वीर उंचावरून खाली पडले ; घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल