बुलढाणा : आता एक नवीनच व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. टक्कल व्हायरसने बुलढाण्यात चांगलच थैमान घातलं असून रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आता परत शेगाव तालुक्यातील ११ गावातील १०० जणांना टक्कल पडल्याची घटना घडली आहे.
रुग्ण संख्येत वाढ..
रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केस गळतीच्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा तात्काळ कामाला लागले आहे. आज पुन्हा शेगाव तालुक्यातील काही गावांचा आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात आला. यामध्ये अजून १०० जण बाधित असल्याचं समोर आले आहे.
अचानक केस गळती होऊन तीन दिवसात टक्कल होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हा प्रशासन पाहिजे तशा पद्धतीच्या उपाय योजना करत नसल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येतेय.