Belly Fat : पुणे : आपण जास्त जाड दिसू नये, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यात चालणे, धावणे तसेच इतर शारीरिक व्यायामही केले जातात. पण काहींना पोटावरील वाढती चरबी अर्थात फॅटमुळे नको नकोसे वाटत असते. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.
जिरे हे चरबी कमी करण्यास फायद्याचे ठरू शकते. जिऱ्याच्या पाण्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. जिऱ्याचे पाणी मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर ठेवा. सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर प्या. या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एंजाइम्स वाढतात आणि मेटाबॉलिजम वाढते. ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी वितळण्यास मदत मिळते.
रिफाईंड तेलाऐवजी नारळाच्या तेलाचा वापर केल्यास चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते. वजनवाढीसाठी आणि पोटावरील चरबी वाढवण्यासाठी रिफाईंड तेलाचा अतिरिक्त उपयोग हे कारण ठरते. यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात जेवण शिजवावे. नारळाच्या तेल वजन घटवण्यासाठी फायद्याचे असते. नारळाच्या तेलातील आढळणारे फॅटी अॅसिड्स चरबी जाळण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिजम वाढवून भूक नियंत्रणात आणण्यासाठीही उपयोगी ठरतात.