पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.यावेळी ओमायक्रॉन विषाणू धोका वाढला आहे, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाच्या राज्यातील इन्साकॉग प्रयोगशाळांच्या अहवालानुसार आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये १३ पुण्याचे असून नागपूर व ठाण्यातील प्रत्येकी २ तर अकोला येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात कोरोना ओमायक्रॉन विषाणूच्या एक्सबीबी व्हेरिएंटचे १८ रुग्ण आढळून आले असून प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. या २० पैकी १५ जणांचे लसीकरण झाले असून ५ जणांविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
शिवाय पुण्यात बीक्यू.१ आणि बीए.२.३.२० प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हे सर्व रुग्ण २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळातील आहेत. दरम्यान, महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. लोकांनी मास्क लावणे गरजेचे आहे, असे दिल्ली ‘एम्स’चे निवृत्त संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.