Health News: पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या बहुतांश जण आहाराकडे खूप लक्ष देतात. अतिरिक्त कोणतीही गोष्ट जाऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. पण असे काही पदार्थ असतात ते काही केल्या खाल्ल्याशिवाय मन भरत नाही. त्यापैकी एक म्हणजे तळलेले पदार्थ. हेच तळलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो.
तळलेले पदार्थ कमी केल्यास पोटाचे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होते. यामुळे अनेक समस्या दूर राहतात आणि निरोगी राहण्यास मदत होते. तळलेले पदार्थ थांबवण्याचा एक फायदा म्हणजे एखादी व्यक्ती चांगली झोपू शकते. यासोबतच मूडही फ्रेश राहतो. तळलेल्या अन्नामुळे टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित आजार होतात. जे लोक तळलेले अन्न खातात त्यांचे फक्त पचनच बिघडते असे नाही तर गॅसेस आणि अॅसिडिटीचाही सामना करावा लागतो. असे पदार्थ न खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटीपासूनही दूर राहता येते.
याशिवाय, तळलेले अन्न शरीरात रोगांचा धोका वाढवते. तळलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनियंत्रित रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल पातळी यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तळलेले पदार्थ खाणे टाळल्यास याचा चांगला फायदा होऊ शकतो.