सुरेश घाडगे
Life Donation : परंडा, (धाराशिव) : शहरातील योगीराज हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. देवदत्त कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करुन एका महिलेच्या पोटातील २ किलो वजनाचा गोळा बाहेर काढुन त्या महिलेस त्यांनी जिवदान दिले. (Life Donation)
Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम सुरु
शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ४० वर्षीय महिलेच्या मागील तीन वर्षापासुन सतत पोटात दुखत होते. त्या महिलेने अनेक डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. योग्य निदान न झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. महिलेच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. परंतु उपयोग झाला नाही. अखेर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी शहरातील योगीराज हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. देवदत्त कुलकर्णी यांच्याकडे तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
सोमवार (ता.१५) रोजी महिला डॉ.कुलकर्णी यांच्याकडे गेल्यानंतर सोनोग्राफी, सीटीस्काॅन आदी तपासणी केल्यानंतर महिल्याच्या गर्भाशयाच्या पिशवीला तब्बल दोन किलो वजनाचा मांसाचा गोळा असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. वाढलेला गोळा शस्त्रक्रिया करुन काढवा लागणार आहे.अन्यथा महिलेच्या जिवितास धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, डॉ. देवदत्त कुलकर्णी यांनी एक तासच्या शस्त्रक्रिये नंतर महिलेच्या पोटातील दोन किलो वजनाचा गोळा बाहेर काढला व यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी सहाय्यक म्हणून गणेश शिंदे, भुलतज्ञ चेतन सहस्त्रबुद्धे यांचे सहकार्य लाभले. महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी झाली जिवितास होणारा धोका टळल्यामुळे कुटुंबाने समाधान व्यक्त केले.