पुणे : गेल्या 24 तासात 20,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,39,073 इतकी आहे, ही संख्या देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.32% इतकी आहे.
गेल्या 24 तासात एकूण 4,50,820 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.86 (86,86,15,168) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.44% आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.47(1,99,47,34,994) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,62,39,248 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
आतापर्यंत 3.78 (3,78,17,085) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.