दिनेश सोनवणे
दौंड : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, उपजिल्हा रुग्णालय दौंड व ग्रामीण रुग्णालय, यवत यांच्या संयुक्त विद्यमाने यवत येथे आयोजित माता सुरक्षित तर घर सुरक्षित या महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या माझ्या हस्ते पार पडले.
कोविड महामारीच्या कालावधीत आपण उभे केलेल्या ३०० बेडच्या सुसज्ज DCHC व CHC सेंटर ने हजारो रुग्णांना आधार दिला व त्याकामी सर्व शासकीय आरोग्य सेवकांचे मोलाचे योगदान मिळाले यापुढे देखील गोर गरिबांना शासकीय आरोग्य सेवेद्वारे मोफत व योग्य उपचार मिळावेत यासाठी व दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असून यवत येथे ५ कोटी रुपयांची ट्रॉमा केअर ची इमारत व दौंड उपजिल्हा रुग्णालयच्या ३५ कोटी रुपये खर्चाच्या १०० बेडचे सूसज्ज व अद्ययावत इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे यामाध्यमातून दौंड तालुक्यातील शासकीय आरोग्य सेवा अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापुरकर, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव, जेष्ठ मार्गदर्शक श्री. सुरेश भाऊ शेळके, सरपंच श्री. समीर दोरगे, श्री. समीर सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.