पुणे : भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,30,713 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.30% आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.50% झाला आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 198 कोटी 88 लाखांचा (1,98,88,77,537) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,60,96,863 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 74 लाखांहून अधिक (3,74,90,962) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत 14,629 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,29,83,162 झाली आहे. गेल्या 24 तासांत, देशात नव्या 16,678 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,78,266 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 86 कोटी 68 लाखांहून अधिक (86,68,88,980) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.18% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5.99%.इतका नोंदला गेला आहे.