मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित रिअॅलिटी शो Bigg Boss 20 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नव्या सीझनमध्ये टीव्ही कलाकारांसोबत सोशल मीडिया क्रिएटर्स, गायक, मॉडेल्स, खेळाडू आणि प्रादेशिक सिनेमातील कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धा चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.

या सीझनमध्ये अभिनेत्री माही विजने घरात प्रवेश केला आहे. ‘लागी तुझसे लगन’मधील नकुशाच्या भूमिकेमुळे ती लोकप्रिय झाली. तिने यापूर्वी रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. तिच्यासोबत अभिनेत्री कनिका मानही बिग बॉसच्या घरात आली आहे. ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेमुळे कनिकाला विशेष ओळख मिळाली.

अभिनेता अमन गांधीनेही शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याने ‘D4 – Get Up and Dance’मधून अभिनय क्षेत्रात सुरुवात केली होती. तर पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल ईशा रिखी देखील यंदाच्या सीझनचा भाग आहे.

सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे बॉक्सर मेरी कोम. 6 वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या आणि ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या मेरी कोम यांची बिग बॉसमधील उपस्थिती वेगळी ठरणार आहे.
रिअॅलिटी शो ‘MTV Roadies: Double Cross’चा विजेता कुशल तंवर उर्फ गुल्लू आणि लोकप्रिय गेमिंग क्रिएटर तन्मय सिंग उर्फ Scout यांचाही शोमध्ये समावेश आहे. सोशल मीडिया स्टार अरिशफा खानदेखील स्पर्धक आहे. तिचे Instagramवर 29 million पेक्षा जास्त followers असल्याचे सांगितले जाते.
भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे, ‘पंचायत’मधून लोकप्रिय झालेला अभिनेता आसिफ खान, पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल, अभिनेत्री आणि मॉडेल रिती तिवारी, गायक काझी तौकीर आणि रॅपर यंग डीएसए यांचाही शोमध्ये सहभाग आहे.
याशिवाय मॉडेल-अभिनेत्री उदिती सिंग आणि ऑस्ट्रियन अभिनेता-मॉडेल रोहेद खान हे देखील बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. रोहेदने ‘तेजस’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सरजमीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार एकाच घरात आल्याने यंदाच्या सीझनमध्ये कोणाची रणनीती यशस्वी ठरणार आणि कोण लवकर घराबाहेर जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.







