Uruli Kanchan News : उरुळी कांचन (पुणे) : झी मराठी या मराठी वाहिनीवर ९ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्स या गायनाच्या रियालटी शोमध्ये उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आदित्य महादेव फरतडे याची निवड झाली आहे.
आदित्य याची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक
झी मराठी या मराठी वाहिनीवर ९ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. या निवड चाचणीमधून राज्याच्या विविध भागातील टॉप १२ रत्नांची या शोमध्ये निवड करण्यात आली. या अंतिम निवडीमध्ये पुणे जिल्ह्यातून फक्त उरुळी कांचन येथील १२ वर्षांच्या आदित्य महादेव फरतडे याची निवड झाली आहे. आता तो आपल्या गाणी गाऊन सादरीकरण करणार आहे. Uruli Kanchan News
महाराष्ट्रातून ६ ते १४ वयोगटातील असंख्य मुलांनी निवड चाचणी (ऑडिशन) दिली. यामध्ये महाराष्ट्रातून फक्त १२ मुलांची निवड करण्यात आली. महादेव फडतरे हे मूळ धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील साकत (बु) येथील रहिवासी आहे. मागील 20 वर्षांपासून ते उरुळी कांचन येथे राहतात. तसेच उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूल या ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूलचे संगीत शिक्षक महादेव फरतरे यांचा आदित्य हा मुलगा आहे. आदित्यचे वडील हे शाळेमध्ये संगीत शिक्षक असून, हार्मोनियम, तबला, गायन आदि शिकवत आहेत. वडील महादेव फडतरे हे गायक असल्याने ते रोज आदित्यकडून एक तास सुगम गायनाचा रियाज करून घेतात. तसेच आदित्य हा इयत्ता सातवीमध्ये एंजल हायस्कूल या शाळेत शिकत आहे.
आदित्यच्या जडणघडणीत ओम एज्युकेशन सोसायटीचे एंजल हायस्कूलचे मुख्य अधिकारी सचिन अग्निहोत्री, अविनाशजी सेलुकर, एंजल हायस्कूलसचे मुख्याध्यापक चेतन सोनवणे, उपमुख्याध्यापिका प्रिसिल्ला जॉन, पालक वर्ग, विद्यार्थी मित्र तसेच उरुळी कांचन गावच्या ग्रामस्थांचे फार मोलाचे सहकार्य लाभले आहे. रियालिटी शोमध्ये आदित्य याची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जेष्ठ गायक ‘सारेगमप’चे महागुरू पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते आदित्य फरतडे याला गुरुकिल्ली देण्यात आली. तसेच आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’मध्ये धमाल सादरीकरण केल्याबद्दल भेटवस्तूही देण्यात आली. Uruli Kanchan News