TV News : मुंबई : माणसाची आजची जगण्याची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. विशेष म्हणजे स्पर्धा वाढलेली आहे. स्वतःला स्थिर करायचे म्हणजे कामाला वेळ देणे हे आलेच. यामुळे बऱ्याच जणांना तणावाच्या वातावरणातून जावे लागते. अशावेळी घरबसल्या निव्वळ काही तास हसवणारे कार्यक्रम जर पाहायला मिळाला तर ते त्या व्यक्तींना हवे असते. सध्या तरी छोट्या पडद्यावर मराठीच्या बाबतीत सांगायचे झाले तर जे दोन-चार विनोदी कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यात टेन्शन वरची मात्रा अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. TV News
टेन्शन वरची मात्रा अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’
सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम दाखवला जातो. १४ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता दाखवणे सुरू केले जाणार आहे. प्रत्येक मराठी रसिकाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले. तो कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! या कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपला मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. कोविड काळात तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या टेंशनवरची मात्रा ठरली. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा अन् कुटुंबासोबत बसून पाहण्याचा फॅमिली शो तुम्हाला हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोद ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत तुमचे सहकुटुंब स्वागत करायला तयार आहे. या कार्यक्रमाला तब्बल पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झालेला आहे. TV News
समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, नम्रता सांबेराव हे तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेले आहेत. ठरल्याप्रमाणे अभिनेते प्रसाद ओक, अभिनेत्री सही ताम्हणकर हे परिक्षक म्हणून तुमच्या भेटीला येणार आहेत. प्राजक्ता माळी ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. TV News