मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळींना त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठित मनाला जाणारा जा पुरस्कार यावर्षी जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स संदर्भात घोषणा केली. पारेख 79 वर्षांच्या आहेत. 60 – 70 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून आशा पारेख त्यावेळी चर्चेत होत्या.बॉलिवूडचा एक काळ पारेख यांच्या चित्रपटांनी गाजवला होता.
आशा पारेख यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. पारेख यांचे कटी पतंग आणि तिसरी मंजिल हे चित्रपट तर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. आशा पारेख यांचे आजही अनेक चाहते आहेत. स्वतःच्या अभिनयाच्या ताकदीवर पारेख यांनी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची वेगली ओळख निर्माण केली.
1959 ते 1973 या काळात विशेषत्वाने आशा पारेख यांनी बॉलिवूडवर जादू केली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंद केले आहे.
पारेख यांनी चित्रपट सृष्टीसाठी जे योगदान दिले त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आशा पारेख यांनी 60 ते 70 च्या दशकात त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं.