पुणे : दिग्दर्शक, निर्माता रोहित शेट्टीचा सर्कस या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रोहित शेट्टीची आवडती टीम आहे. हा चित्रपट 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे
अभिनेते रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस हे स्टार या चित्रपटात असून ‘सर्कस’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, सिद्धार्थ जाधव या विनोदी कलाकारांचा चित्रपटात भूमिका आहेत.
टिझरची सुरुवात संजय मिश्रा यांच्यापासून होते, सर्कस या चित्रपटाची कथा साठच्या दशकाची असल्याचे सांगतात. चित्रपटात रणवीर आणि वरुण शर्मा दुहेरी भूमिकेत आहेत.
या चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त वरुण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, मुकेश शर्मा, पूजा हेगडे, संजय मिश्रा हे स्टार्स लीड रोलमध्ये दिसणार आहेत.
या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर 2 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.