मुंबई: ‘काटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हिच्या आकस्मिक निधनाला काही महिने उलटल्यानंतर, तिचा पतीने केलेल्या एका खळबळजनक विधानाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेफालीचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे ‘काळी जादू’ असल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे. शेफालीला स्पर्श केल्यावर मला काहीतरी गडबड असल्याचं जाणवायचं, म्हणून आम्ही घरात खूप पूजा करत होतो.

जून २०२५ मध्ये शेफालीचे निधन झाले होते. अवघ्या सिनेसृष्टीला चटका लावून गेलेल्या या घटनेनंतर अधिकृत वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा झटका’ (Cardiac Arrest) असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये परागने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले आहे.

“तिच्यावर करणी-बाधा केली होती” परागने अत्यंत गंभीर आरोप करताना म्हटले की, “लोक विश्वास ठेवत नाहीत, पण जिथे देव आहे तिथे सैतानही आहे. लोक दुसऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत त्यातूनच हे घडतात.” परागच्या मते, त्याने अशा शक्तींचा अनुभव घेतला होता. पूजेला बसल्यावर आपल्याला काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायची, पहिल्यांदा काही झाले नाही, पण दुसऱ्या वेळी परिस्थिती हाताबाहेर गेली. असेही त्याने नमूद केले.








