Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 October 2026, 15:04

डोर्लेवाडी : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. मात्र, त्यांच्याच जयंतीनिमित्त डोर्लेवाडीत (ता. बारामती) आयोजित कार्यक्रमाला निमंत्रणपत्रिकेतील नावांवरून निर्माण झालेल्या वादाचे गालबोट लागल्याची चर्चा रंगली. स्थानिक स्कूल कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नावांचा समावेश करण्यावरून नाराजी निर्माण झाली. अखेर अनेक बैठका आणि नाराजांची मनधरणी केल्यानंतर कार्यक्रम पार पडला. या पार्श्वभूमीवर युवा नेते युगेंद्र पवार यांनी शाळेच्या आवारात राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

डोर्लेवाडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात युगेंद्र पवार बोलत होते. कर्मवीरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. त्यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली, असे प्रतिपादन पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्था आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जुने नाते असल्याचा उल्लेख करताना, शरद पवार यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले असून त्यांचा विवाहही संस्थेच्या प्रांगणात झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा हे शिक्षणासोबत संस्कारांचे केंद्र असल्याने शाळेच्या आवारात राजकारण होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निमंत्रणपत्रिकेतील नावांवरून वाद

 

कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान निमंत्रणपत्रिकेतील नावांवरून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा गावात होती. एका माजी कारखाना संचालकाचे नाव निमंत्रणपत्रिकेत छापले नसल्याने, नंतर हाताने नाव लिहून पत्रिका वितरित करण्यात आल्याचा आरोप आहे. यावरून संबंधित संचालकांचे पुत्र आणि काही ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याचे समजते. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक बैठका झाल्या. नाराज संचालकांची सार्वजनिक कार्यक्रमात दिलगिरी व्यक्त करण्याच्या अटीवर मनधरणी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर कार्यक्रमातील संभाव्य अडथळा दूर झाला.

नवीन शाळेच्या इमारतीचे आश्वासन

डोर्लेवाडी येथील शाळेची सध्याची इमारत जुनी झाली असून, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. या कामाला लवकरच सुरुवात करून पुढील वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचा कार्यक्रम नवीन इमारतीत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल युगेंद्र पवार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुप्रिया मनोज नाळे, उपसरपंच राहुल भोपळे, मुख्याध्यापक तुकाराम खताळ,माजी सभापती अशोक नवले, छत्रपती साखर कारखान्याचे संचालक संतोष मासाळ, भगवान क्षीरसागर,डॉ. मोहन नेवसे, सुनील म्हेत्रे, कांतीलाल नाळे, रुपाली लोणकर, अॅड. अतुल भोपळे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बापूराव गवळी, यशोदीप नाळे, गजानन नाळे, दिलीप गाडे आदी उपस्थित होते.यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; 'त्या' ऑडिओ क्लीपने खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp