Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 1 October 2026, 15:28

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. पाच मतदारसंघांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 3-1-1 असा जागावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत असल्याचे समोर आले आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील तिढा अद्याप कायम असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अंतिम जागावाटपाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, तर नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागा भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर मात्र अद्याप एकमत झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडूनही जोरदार दावा केला जात आहे. मंगेश चिवटे आणि सचिन सानप यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे भाजपकडूनही या जागेसाठी इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने महायुतीमध्ये जागावाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेवर कोणत्या पक्षाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर 9 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

 

या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधरचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षकचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षकचे जयंत आसगावकर हे प्रतिनिधित्व करतात.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने महायुतीतील जागावाटपाबाबतच्या चर्चांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे शिक्षक मतदारसंघाचा निर्णय कोणाच्या बाजूने होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28
Next Post

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp