Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 1 October 2026, 16:21

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढला असून, पलूस तालुक्यातील आंधळी येथे सोमवारी सायंकाळी बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला. बिबट्या घराच्या दारात येऊन कुत्र्यावर झडप घालण्याच्या तयारीत असताना नातीने प्रसंगावधान दाखवत कुत्र्याला घरात ओढून घेतले. त्यामुळे 90 वर्षांच्या आजी-आजोबांसह कुत्र्याचाही जीव वाचला. या घटनेनंतर समृद्धी संभाजी पाटील (वय 24, रा. बोरगाव, ता. वाळवा) हिचे कौतुक होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पलूस तालुक्यातील आंधळी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कुरण वस्ती आहे. या ठिकाणी जयसिंग यशवंत माने आणि बबूताई जयसिंग माने हे वृद्ध दाम्पत्य राहते. आजी-आजोबांची देखभाल करण्यासाठी त्यांची नात समृद्धी पाटील ही त्यांच्यासोबतच राहते. सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास बबूताई स्वयंपाकघरात समृद्धीला मदत करत होत्या. तर जयसिंग माने बाहेरील खोलीत झोपले होते.

याच वेळी घराच्या दरवाजाजवळ बसलेला कुत्रा अचानक जोरात भुंकू लागला. समृद्धीने दरवाजाकडे पाहिले असता तिला समोर बिबट्या उभा असल्याचे दिसले. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच समृद्धीने क्षणाचाही विलंब न करता कुत्र्याला घराच्या आत ओढून घेतले आणि दरवाजा आतून घट्ट धरून ठेवला.

कुत्र्याला घरात घेतल्यानंतर बिबट्याने दरवाजावर जोरदार धडक दिली. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने बिबट्याला घरात प्रवेश करता आला नाही. काही वेळाने बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेमुळे समृद्धीसह आजी-आजोबांचीही मोठी घाबरगुंडी उडाली.

 

दरम्यान, मंगळवारी पुन्हा माने वस्ती परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढत असल्याने वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा शोध घ्यावा आणि आवश्यक ठिकाणी पिंजरा अथवा ट्रॅप लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24

आळंदीच्या खासगी क्लासची सहल ठरली जीवघेणी! दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Thursday, 1 October 2026, 19:33

अभिजित दीपकेंचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; नितेश राणेंचा शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप,माफीची मागणी..

Thursday, 1 October 2026, 19:02

भिगवणमधील वसुली प्रकरणात आरोपीला जामीन! इंदापूर न्यायालयाचा आदेश; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

Thursday, 1 October 2026, 18:22

कराड प्रकरणात नवा ट्विस्ट! धनंजय मुंडें तातडीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला,नेमकी कशावर चर्चा?

Thursday, 1 October 2026, 18:12

खंडाळा एक्झिटवर पर्यटकाकडून ऑनलाइन पैसे उकळले; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Thursday, 1 October 2026, 18:02
Next Post

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp