पुणे प्राईम न्यूज डेस्क: नितेश तिवारीच्या रामायणाची घोषणा झाल्यापासून कलाकार, चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. रामायण या चित्रपटासाठी सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत होते. आता अभिनेत्रीने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली असून कायदेशीर कारवाईबाबतही बोलली आहे.
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर रामच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता साई पल्लवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘रामायण’साठी शाकाहारी बनण्याच्या अफवांचे खंडन केले आहे. या अफवा ‘बनावट’ असल्याचे सांगत अभिनेत्रीने कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. अफवांवर संतप्त झालेल्या साई पल्लवीने अधिकृत हँडलवर स्वतःच्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, बहुतेक वेळा जवळ जवळ प्रत्येक वेळी, जेव्हा जेव्हा मी निराधार किंवा अफवा पाहते तेव्हा मी गप्प राहणे आणि काहीही न बोलणे पसंत करते. मी सहसा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विशेषतः रिलीज, चित्रपटांची घोषणा किंवा माझ्या कारकीर्दीतील संस्मरणीय क्षणांवर मौन बाळगते. पण प्रत्येक वेळी असे होणार नाही.