Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह, उरुळी कांचन परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 14 December 2024, 19:44

उरुळी कांचन, (पुणे) : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात शनिवारी (ता. 14) दत्त जयंती भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

अभिषेक, पूजा, काकडा आरती, पालखी, दिंडी, मिरवणूक, भजन, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी जयंती भक्तिमय वातावरणात साजरी झाली. जयंतीनिमित्त विविध गावांमध्ये दत्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताका व फुग्यांची सजावट करून विद्युत रोषणाई करीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील मंदिर सजविण्यात आले होते. दर्शनासाठी नागरिकांच्या सर्वच ठिकाणी रांगा लागल्या होत्या.

कदमवाकवस्ती येथे दत्त मंदिर व पीर येथे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी सहा वाजता महाअभिषेक, आठ वाजता श्री दत्त गायत्री व स्वामी गायत्री यज्ञ पार पडला. तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या दत्त मंदिरात उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सचिन जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार बापूसाहेब मत्रे, अमोल खांडेकर धनंजय भोसले, सुदर्शन माने, अनिल खोमणे, महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ, मनीषा सांगळे, सुप्रिया काळे, आदि पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते.

श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन आयोजित तुपे वस्ती येथे दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्तजन्म सोहळा होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुदत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तुपे, उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कस्तुरी मंगल कार्यालयाच्या महिलांनी पाळणा म्हणत दत्त जन्म सोहळा साजरा केला. या वेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कोरेगाव मूळ येथे आदर्श सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बोधे काकडेवस्ती येथे दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी भजन, कीर्तन, महाप्रसाद, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

दरम्यान, दिवसभरात भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलावर्गाने दत्तजन्म सोहळ्यानिमित्त एकत्रित येऊन पाळणा, नाव ठेवणे असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले.

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘महिला राज’! पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायतीची सूत्रे महिलांच्या हाती; समस्यांचा निकाल किती वेगाने लागणार?

Friday, 27 November 2026, 17:26

“उद्या माझे नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर…” पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; नेमकं काय म्हणाले?

Friday, 27 November 2026, 17:25

पुण्यातील गुन्हेगारांना आता खैर नाही! पालकमंत्री सुनेत्रा पवारांचा पोलिसांना थेट इशारा; कोयता गँग, ड्रग्ज माफिया अन् अवैध शस्त्रधारकांवर होणार मोठी कारवाई!

Friday, 27 November 2026, 16:39

लोकसभेचा नकाशाच बदलणार! महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून थेट ७२ होणार? ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन!

Friday, 27 November 2026, 16:16

वाघोलीसह पुणे महापालिकेत समाविष्ट गावांतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा! आमदार माऊली आबा कटके यांची पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

Friday, 27 November 2026, 16:14

कॅम्प परिसरात बेवारस बॅग, बॉम्ब असल्याचा संशय अन् पोलिसांची घटनास्थळी धाव; बॉम्बशोधक पथकानं परिसर खाली केला अन् झडती घेताच…

Friday, 27 November 2026, 14:45
Next Post
Santosh Deshmukh Murder case transferred to CID beed

बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp