पुणे : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरी गोंडस परीचे आगमन झाले आहे. दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. मुंबईतील रुग्णालयात दीपिका पादुकोणनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
दीपिका आणि रणवीर शनिवारी लक्झरी कारम+धून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, त्यामुळे चाहते बाळाची गोड न्यूज कधी कानी येईल, याची आतुरनेते वाट पाहत होते. यानंतर आज दीपिका-रणवीरला कन्यारत्न लाभलं आहे. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. तसंच, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीच दीपवीरच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे, असं लिहिण्यात आलं आहे.
दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. लग्नानंतर त्यांनी सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकलीचे आगमन झालं आहे. बाळाच्या जन्माने दीपिका आणि रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.