Hanuman movie : हनुमान या दाक्षिणात्य सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हनुमान सूर्याला खायला गेल्यानंतर पुढे कशा प्रकारच्या घटना घडतात. दाक्षिणात्य सिनेमा हनुमानमध्ये हिच स्टोरी काल्पनिक स्वरुपमात मांडण्यात आली आहे. सिनेमा अतिशय कमी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. सिनेमातील व्हिज्युअल्समुळे प्रेक्षकांची सिनेमाला तुफान पसंती मिळताना दिसत आहेत. मात्र, क्रीटीक्सकडून सिनेमावर टीका होत आहे. त्यावर हुनमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी खळबळजक दावे केले आहेत.
काय म्हणाला हनुमानचा दिग्दर्शक?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रशांत वर्माने सिनेमाबाबत एक ट्वीट केले आहे.त्यांनी लिहिले की, “आमच्या टीमविरोधात प्रपोगंडा सुरु आहे. हा प्रपोगंड्याचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रोफाईल बनवण्यात आले आहेत. अस वाटतय की कालच्या भोगीच्या आगीत डिजीटल स्वरुपात घाण पसरवण्याचे काम सुरु आहे”
“मी या काळात आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानतो. धर्मासोबत उभे राहिलो की, विजय निश्चितपणे होतोच, असा विश्वास चाहत्यांनी आम्हाला दिला. या सक्रांतीला हनुमानची पतंग नकारात्मकतेला मागे टाकत भरारी घेण्यास सज्ज आहे.”, असे हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत शर्मा म्हणाले.
सध्या हनुमान सिनेमाचे तेलगू वर्जन तुफान कमाई करत आहे. दरम्यान आता हनुमान हिंदीमध्येही बंप्पर कमाई करताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात हनुमानने 12 कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत शर्मा यांनी काही खळबळजनक दावे केले आहेत.